मुंबई -अभिनेत्री सोनम कपूर आणि दुलकर सलमान यांची जोडी असलेला 'झोया फॅक्टर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरवर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हा ट्रेलर पाहून सोनमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा-सूर अन् भावनांचा मिलाफ, राणू मंडल यांच्या आवाजातील पहिलं गाणं प्रदर्शित
या चित्रपटात 'झोया' म्हणजे सोनम कपूर ही भारतीय क्रिकेट संघासाठी 'लकी चार्म' असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सोनम आणि दुलकर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. दुलकर या चित्रपटात क्रिकेटरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.