महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राजामौलींच्या 'आरआरआर'मध्ये झळकणार रामचरण, एनटीआर अन् आलिया - jnr NTR

सिनेमाची कथा दोन शुर स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित असणार आहे. चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम आणि अन्य काही भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे

आरआरआर

By

Published : Mar 14, 2019, 1:42 PM IST

मुंबई- एस एस राजामौली यांच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 'आरआरआर' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात रामचरण आणि एनटीआर हे अभिनेते मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हे त्रिकूट स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दल घोषणा केली आहे. याशिवाय चित्रपटात अजय देवगणही महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे.

सिनेमाची कथा दोन शुर स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित असणार आहे. चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम आणि अन्य काही भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. ३० जुलै २०२०ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details