मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा आज वाढदिवस आहे. आपल्या सौंदर्याने तिने नेहमीच चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं आहे. मात्र, तिच्या हृदयावर राज्य करणारा व्यक्ती म्हणजे तिचा प्रियकर रोहमन शॉल. बऱ्याच दिवसांपासून रोहमन आणि सुष्मिताच्या रिलेशनशीपच्या चर्चा पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही एकमेकांप्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्त करत असतात. आज सुष्मिताच्या वाढदिवशी रोहमनने तिच्यासाठी खास रोमॅन्टिक अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहमनने सुष्मिताचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ''ज्याप्रमाणे तो उगवता सूर्य साऱ्या विश्वाला प्रकाशमान करतो, त्याचप्रमाणे तू माझं आयुष्य प्रकाशित करतेस. या खास दिवसाच्या निमित्ताने मी तुझ्याविषयी खूप काही लिहिणार होतो. पण, तुझा विचार करतो त्यावेळी मी कायमच नि:शब्द आणि अवाक् होऊन जातो. अगदी तसाच जसा तुला हे छायाचित्र काढताना पाहून झालो होतो.'
हेही वाचा -वाढदिवस विशेष : ऐश्वर्या रायला हरवून 'या'मुळे सुश्मिता सेन बनली होती 'मिस इंडिया'