महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विद्या बालन-रितेशसोबत अक्षयने केला होता धमाल प्रँक, रितेशने केला उलगडा

रितेश आणि अक्षय दोघे मिळून वेगवेगळ्या शहरात या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. प्रमोशनदरम्यान रितेशने त्यांच्या 'हे बेबी' या चित्रपटादरम्यानची आठवण शेअर केली.

विद्या बालन - रितेशसोबत अक्षयने केला होता धमाल प्रँक, रितेशने केला उलगडा

By

Published : Oct 18, 2019, 8:50 AM IST

मुंबई -अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपटाच्या सेटवर त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखला जातो. कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो सेटवर हलकंफुलकं वातावरण तयार करत असतो. त्याच्या सहकलाकारांसोबतही तो धमाल करत असतो. सध्या तो 'हाऊसफुल ४' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सेनॉन, पुजा हेगडे, क्रिती खरबंदा हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रितेशने अक्षयबाबत एक खुलासा केला आहे.

रितेश आणि अक्षय दोघे मिळून वेगवेगळ्या शहरात या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. प्रमोशनदरम्यान रितेशने त्यांच्या 'हे बेबी' या चित्रपटादरम्यानची आठवण शेअर केली. त्याने सांगितलं, की 'हे बेबी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षयने त्याच्या मोबाईलवरुन विद्या बालनला एक रोमॅन्टिक मेसेज पाठवला होता. त्याचा मेसेज पाहुन लगेच विद्या बालनच्या मोबाईलवरुनही त्याला लगेज त्याचा रिप्लाय आला. पुढे त्यांना समजले, की दोघांचेही फोन अक्षयजवळ होते. तो त्यांच्यासोबत प्रँक करत होता. 'हे बेबी' चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि विद्या बालन हे एकत्र झळकले होते. त्यावेळी त्याने हा प्रँक केला होता. शूटिंगदरम्यान धमाल करण्यात वेगळाच आनंद मिळतो, असंही तो यावेळी म्हणाला.

हेही वाचा -'हाउसफुल 4 एक्सप्रेस'मधून प्रवास करतानाचा अक्षय, रितेशचा धमाल व्हिडिओ

अक्षय आणि रितेशने 'हाऊसफुल २' आणि 'हाऊसफुल ३' मध्येही भूमिका साकारली होती. आता पुन्हा 'हाऊसफुल ४'मध्येही त्यांची धमाल पाहायला मिळणार आहे. २६ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -इतिहासात पहिल्यांदाच "हाऊसफुल ४" चे 'प्रमोशन ऑन व्हील्स' रेल्वेतून

ABOUT THE AUTHOR

...view details