महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

VIDEO: अक्षयच्या 'बाला' गाण्यावर रितेशचा लाडक्या मुलांसोबत धमाल डान्स - Riteish Deshmukh latest news

रितेशची दोन मुले रिहान आणि राहिल यांच्यासोबत रितेशने 'बाला' गाण्यावर ठेका धरला होता. जेनेलियाने हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.

VIDEO: अक्षयच्या 'बाला' गाण्यावर रितेशचा लाडक्या मुलांसोबत धमाल डान्स

By

Published : Nov 2, 2019, 7:34 PM IST

मुंबई -अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा 'हाऊसफुल ४' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या चित्रपटातील अक्षय कुमारचं 'बाला' हे गाणं देखील सोशल मीडियावर सुपरहिट झालं आहे. या गाण्याची सध्या प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखनेही आपल्या लाडक्या मुलांसोबत या गाण्यावर धमाल डान्स केला. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रितेशची दोन मुले रिहान आणि राहिल यांच्यासोबत रितेशने 'बाला' गाण्यावर ठेका धरला होता. जेनेलियाने हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा -‘हाऊसफुल ४’च्या सेटवरील 'मस्तीछाप' व्हिडिओ रितेश देशमुखमुळे व्हायरल

'हाऊसफुल ४' हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई करत १५० कोटीचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉन, क्रिती खरबंदा आणि पुजा हेगडे यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तसेच, राणा डग्गुबती, चंकी पांडे, सौरभ शुक्ला, जॉनी लिव्हर यांचीही धमाल कॉमेडी या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

फरहाद सामजी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

हेही वाचा -'शैतान का साला' बनुन 'हाऊसफुल ४'चा 'बाला' प्रेक्षकांच्या भेटीला, नवं गाणं प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details