महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रितेश - जेनेलियाचं बिनसलं? 'गृहक्लेश' झाला ऑनलाईन, पाहा ट्विट - जेनेलिया डिसूजा - देशमुख

नेहमी एकेमेकांसाठी रोमॅन्टिक पोस्ट शेअर करणाऱ्या रितेश आणि जेनेलियाने यावेळी मात्र एकमेकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

रितेश - जेनेलियाचं बिनसलं? 'गृहक्लेश' झाला ऑनलाईन, पाहा ट्विट

By

Published : Sep 23, 2019, 1:06 PM IST

मुंबई- मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा - देशमुख यांना ओळखलं जातं. सोशल मीडियातही या जोडीची चर्चा असते. तसेच, त्यांची लोकप्रियताही मोठ्या प्रमाणावर आहे. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. दोन मुलांचे ते आईवडिलही आहेत. मात्र, नेहमी एकेमेकांसाठी रोमॅन्टिक पोस्ट शेअर करणाऱ्या रितेश आणि जेनेलियाने यावेळी मात्र एकमेकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

होय, रितेश आणि जेनेलिया यावेळी त्यांच्या रोमॅन्टिक पोस्टमुळे नाही, तर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना दिलेल्या उत्तरामुळे चर्चेत आले आहेत. त्याचं ट्विट पाहून त्यांच्यात नेमकं काहीतरी बिनसलं की काय, असे प्रश्न चाहते विचारत आहेत.

रितेशने एक फोटो ज्यावर 'प्रत्येक रागावलेल्या महिलेच्या मागे एक पुरुष असतो ज्याला अजिबात माहीत नसतं की त्याची चूक काय झाली', अशा ओळी असलेलं मिम शेअर केलं आहे.

तर जेनेलियानेही त्याला उत्तर देत 'मी सर्वसामान्यपणे नवऱ्याच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा देते तेव्हा तो चुकीचाच असतो', अश्या ओळी असलेलं मिम शेअर केलं आहे.

त्याचे हे ट्विट पाहून काही युजर्सनी देशमुख कुटुंबाचा 'गृहक्लेश ऑनलाईन', अशीही प्रतिक्रिया दिली आहे. तर, काहींनी ही कथा घरोघरचीच आहे, अशी कमेंट केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details