मुंबई -बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्क येथे उपचार घेत आहेत. लवकरच ते भारतात परतणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट्स देत असतात. अलिकडेच त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांच्या लोकप्रिय 'बॉबी' चित्रपटातील गाण्याच्या आठवणीला उजाळा मिळाला आहे.
ऋषी कपूर यांचा 'बॉबी' चित्रपटातील 'मै शायर तो नही' हे गाणे प्रचंड हिट झाले होते. न्यूयॉर्क येथे ते एका सलूनमध्ये गेले असता, तिथे हे गाणे सुरू होते. सलूनच्या मालकाने ऋषी कपूर यांना ओळखले आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. ऋषी कपूर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.