मुंबई - पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. अनेक जण यावर युद्ध हा पर्याय नसून चर्चा करून मार्ग काढण्याचे सल्ले देत आहेत. अशातच बॉलिवूड कलाकारांनीदेखील यावर चर्चेने मार्ग काढवा, असे मत मांडले आहे. मात्र, या प्रकरणी अभिनेत्री रिचा चड्ढाने राजकाराण्यांना चांगलाच टोला लगावला आहे.
सगळे प्रचारात व्यग्र तर देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती, रिचा चड्ढाचा राजकारण्यांना टोला
भारत पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे, मात्र सगळेच जण प्रचारात व्यग्र आहेत. मग देशाचे नेतृत्व नेमके कोणाच्या हाती आहे.
भारत पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे, मात्र सगळेच जण प्रचारात व्यग्र आहेत. मग देशाचे नेतृत्व नेमके कोणाच्या हाती आहे. आपल्या सीमेवर सध्या तणावाचे वातावरण असून ३ राज्यांतील विमानतळांवरील उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. अशात देशाच्या शांततेच्या चर्चांमध्ये कोणी सहभागी होतंय का? असा प्रश्न करत तिने फार भयानक परिस्थिती असल्याचे म्हटले आहे.
रिचाच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिच्या या मताला पाठिंबा दिला आहे. तर अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. यानंतर रिचानेही ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत चांगलाच समाचार घेतला आहे.