मुंबई: लॉकडाऊन दरम्यान 'कोरोना व्हायरस' नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण करणारे चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा 'द मॅन हू किल गांधी' या नावाने आणखी एक चित्रपट तयार केला आहे. आगामी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये गांधी आणि नथुराम गोडसे यांचे चेहरे एकत्रित केल्याबद्दल रामूवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
मानवतावादी बाबू गोगिनेनी यांनी पोस्टरसाठी आरजीव्हीवर टीका करताना अपमानकारक म्हटले आहे. आपल्या प्रदीर्घ फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी दिग्दर्शकाला 'पोस्टर मागे घे' अशी विनंतीदेखील केली आहे. कारण अशा गोष्टीमध्ये “निर्णय आणि अचूकपणा” नसतो असेही म्हटलंय. तथापि, नेटिझन्स आणि गोगिनेनी काय म्हणत आहेत हे राम गोपाल वर्माने स्पष्ट उत्तर न देता चित्रपट पाहून निष्कर्ष काढावा असा सल्ला दिलाय.
''पोस्टर मॉर्फ करण्याचा हेतु चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. माझ्या कलात्मक दृष्टीचा उपयोग करणे माझ्या अधिकारात आहे. जसे की देवावर विश्वास ठेवणेदेखील काहींना अपमानास्पद वाटत असेत. अंतिमतः चित्रपट न पाहता हवेत गोळीबार करणे योग्य नाही. तुम्ही एक थंड व्हायची गोळी घ्या आणि बियर घ्या.'', असे उत्तर गोगिनेनी यांना राम गोपाल वर्माने दिलंय.
दुसर्या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्माने लिहिलंय, "बोलण्याचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असे आहे की, जे नाराज आहेत त्यांच्यापासून संरक्षित व्हावे .. जर कोणी रागावलेले नसेल तर आपल्याला याची आवश्यकता नाही."
सत्य, कंपनी, शूल, सरकार आणि 'रात आणि भूत' यासारख्या भयपट चित्रपटांमुळे राम गोपाल वर्मा एकेकाळी नव्या काळातील सिनेमाचा अग्रणी मानला जात असे. त्याचा अगदी अलिकडील सिनेसृष्टीत इतका प्रभाव राहिलेला नाही.