मुंबई - अभिनेता रणवीर सिंगचा अमाप उत्साह आणि दीपिका पदुकोणच्या अनोख्या स्टाईलवर चाहते नेहमीच खूश असतात. या पती पत्नीची जोडी अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असते. आयफा अवॉर्ड्स २०१९ला दोघांनीही हजेरी लावली होती. यावेळी दोघांनीही मीडियाच्या फोटोंना पोज दिल्या. हे फोटो प्रसिध्द झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
'अरे आवरा रे कोणी यांना'... रणवीर-दीपिकावर नेटकरी वैतागले
आयफा अवॉर्ड्स २०१९ला रणवीर आणि दीपिकाने हजेरी लावली होती. दोघांनीही हौसेने मीडियाच्या फोटोंना पोज दिल्या. हे फोटो प्रसिध्द झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
रणवीर-दीपिकावर नेटकरी वैतागले
आयफा अवॉर्ड्स २०१९ मध्ये दोघांचीही वेशभूषा हटके होती. रणवीरचा निळसर रंगाचा आऊटफिट होता. त्याने काळ्या रंगाची काठी हातात धरुन फोटोंना पोज दिल्या. तर दीपिका जांभळ्या रंगाच्या लॉंग गाऊन मध्ये हटके दिसत होती.
असे असले तरी नेटीझन्सने या दोघांवरही ट्रोल्सचा वर्षाव केलायं. 'अरे आवरा रे कोणी यांना', 'जोकर दिसत आहेत', 'काय ध्यान दिसतंय', 'दीपिका, या ड्रेसवर मुंबईच्या रस्त्यावर चालून दाखव', अशा अनेक तिखट प्रतिक्रिया त्यांना मिळत आहेत.