महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रणवीर सिंगला आठवण येतेय सुंदर स्थळांची, शेअर केले फोटो - रणवीरने शेअर केले सुंदर फोटो

रणवीर सिंगने सुंदर लोकेशन्सवरील काही आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परदेशातील हे स्थळ आहे. त्याच्या फोटोला रणवीरने कॅप्शन दिलेली नसल्या तरी त्यावर हजारो कॉमेंट्स आलेल्या दिसतात.

रणवीर सिंग

By

Published : May 27, 2020, 3:50 PM IST

मुंबई: अभिनेता रणवीर सिंगने काही आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परदेशातील सुंदर लोकेशन्सवरील फोटो मनाला भुरळ पाडणारे आहे. पहिल्या चित्रात 34 वर्षांचा हँडसम रणवीर सिंग किनाऱ्यावर उन्हं अंगावर घेताना दिसत आहे. विचारात हरवलेल्या रणवीरचा हा सुंदर फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दुसरऱ्या फोटोत रणवीर सिंग स्विमिंग केल्यानंतर अवतरलेला दिसतो. त्याच्या फोटोला रणवीरने कॅप्शन दिलेली नसल्या तरी त्यावर हजारो कॉमेंट्स आलेल्या दिसतात.

या वर्षांच्या सुरुवातीला रणवीर आणि दीपिकाने व्हॅलेंटाईन डे एका अज्ञात स्थळी साजरा केला होता. अद्यापही त्यांनी आपल्या या स्थळाचा उलगडा केलेला नाही. मात्र काही फोटो त्यांनी शेअर केले होते. लॉकडाऊनच्या काळात रणवीर आणि दीपिकाने आपल्या होम क्वारंटाईनचे फोटो शेअर केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details