मुंबई - आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांवर छाप पाडणारा रणवीर सिंग आता GIF आणि स्टिकर्समध्ये पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर या स्टिकर्सच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहे. रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे काही GIF आणि स्टिकर्स शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर रणवीरचा नवा अंदाज, GIF आणि स्टिकर्समधून साधणार चाहत्यांशी संवाद - 83
रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे काही GIF आणि स्टिकर्स शेअर केले आहेत.
रणवीर सिंग 'गली बॉय', 'सिम्बा', 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' यांसारख्या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेता झाला आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव गणले जाते. त्याला नेहमी चाहत्यांशी संवाद साधायला आवडत असल्याने त्याने स्वत:चे खास स्टिकर्स आणि GIF करून घेतले आहेत. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, हे स्टिकर्स केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील चाहत्यांना वापरता येणार आहे.
सध्या तो त्याच्या आगामी '८३' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १९८३ साली झालेल्या क्रकेट वर्ल्ड कपवर आधारित आहे. या चित्रपटात तो कपील देव यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीला येईल.