लंडन - लंडनमध्ये दीपिका पदुकोणच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले. यानंतर रणवीर सिंगने दिलेल्या प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याने आपले मत मांडत पत्नीबद्दलचे प्रेम व्यक्त केले.
रणवीरने सोशल मीडियावर दीपिकाच्या पुतळ्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले. त्यात त्याने लिहिलेली कॅप्शन चर्चेचा विषय ठरली आहे.