मुंबई -सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर बरेच चेहरे एका रात्रीत प्रसिद्ध झाले. यातीलच एक चेहरा म्हणजे, राणू मंडल. पश्चिम बंगाल येथील राणू यांचा रेल्वे स्टेशनवर गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांच्या आवाजानं चाहत्यांवर अशी मोहिनी घातली, की त्यांच्या व्हिडिओवर लाखो लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या गेल्या. त्यांच्या आवाजाची भूरळ हिमेश रेशमियालाही पडली. अन् त्याने राणूला चक्क त्याच्या आगामी चित्रपटात गाणं गाण्याची संधी दिली.
इंटरनेट सेंसेशन राणू मंडलचा रेल्वे स्टेशन ते रिअॅलिटी शोचा थक्क करणारा प्रवास - सिंगीग सुपरस्टार
पश्चिम बंगाल येथील राणू यांचा रेल्वे स्टेशनवर गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांच्या आवाजानं चाहत्यांवर अशी मोहिनी घातली, की त्यांच्या व्हिडिओवर लाखो लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या गेल्या.
राणू मंडल यांना राहण्यासाठी घर नव्हतं. पोट भरण्यासाठी पैसेही नव्हते. साथ होती ती फक्त त्यांच्या गोड आवाजाची. त्यांचा गोड आवाजच त्यांच्यासाठी दैवी देणगी ठरला. जेव्हा त्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात असायच्या, तेव्हा तेथील प्रवासी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी उभे राहत असत. ते त्यांना कधी खायला बिस्किट देत असत किंवा मग काही रुपये देऊन पुढे जात असत. आज त्याच सर्वसामान्य महिलेला हिमेश रेशमियाच्या मदतीने चित्रपटात गाण्याची संधी मिळाली.
अलिकडेच राणू यांनी सोनी टिव्हीवरील सिंगीग सुपरस्टार या कार्यक्रमात हजेरी लावली होती. येथील स्पर्धकांबरोबर त्यांनी वेळ घालवला. यावेळी त्यांनी आपली जीवनकथा सांगितली. गायक जावेद अली यांनी त्यांना गाणं गाण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गाऊन सर्वांची मने पुन्हा एकदा जिंकली. हा भाग लवकरच प्रसारित केला जाणार आहे. सध्या याचा एक प्रोमो सोनी वाहिनीने शेअर केला आहे.