मुंबई - अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच 'मर्दानी २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील तिचा नवा लूक समोर आला आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे.
'मर्दानी २' हा राणीच्या 'मर्दानी' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात ती महिला पोलिसाची भूमिका साकारत आहे.
मागच्या वर्षी तिचा 'हिचकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतासोबतच चीनच्या बॉक्स ऑफिसवरही दमदार यश मिळवले. आता ती 'मर्दानी २' चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे.
दिग्दर्शक गोपी पुतरन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तर, आदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. १३ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.