मुंबई -बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर या दोघांची जोडी आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहे. दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटात दोघेही भूमिका साकारणार आहेत. नुकतीच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
लव रंजनच्या या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, पुढच्या वर्षी २६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. श्रद्धा आणि रणबीर पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. लवकरच या चित्रपटाच्या शिर्षकाची घोषणा करण्यात येईल.
हेही वाचा -‘तुझ्यात जीव रंगला’मधला 'सन्नी दा' अडकला लग्नाच्या बेडीत
रणबीरसोबत भूमिका साकारण्याविषयी श्रद्धाने सांगितले, की 'त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळत असल्यामुळे मी फार उत्साही आहे. रणबीर हा अतिशय चांगला अभिनेता आहे. त्याच्यासोबत भूमिका साकारण्यासाठी मी बऱ्याच दिवसांपासून उत्सुक होती'.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, रणबीर सध्या आलिया भट्टसोबत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे. तर, श्रद्धा कपूर ही तिच्या 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये ती वरूण धवनसोबत भूमिका साकारताना दिसणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
हेही वाचा -‘आटपाडी नाईट्स’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित