महाराष्ट्र

maharashtra

रजनीकांत, प्रसून जोशी, अर्जुनने दिला मोदींच्या लॉकडाऊन मुदत वाढीला पाठिंबा

By

Published : Apr 14, 2020, 10:02 PM IST

कोरोना व्हायरसचे समूळ उच्चाटन होण्यासाठी देशभर लागू असलेल्या लॉक डाऊनची मुदत ३ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे मनोरंजन जगतातील अनेकांनी स्वागत केले आहे.

celebs react to lockdown extension
लॉक डाऊन मुदत वाढीला पाठिंबा

मुंबई- कोरोना व्हायरसच्या वाढीची सद्य स्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लॉक डाऊनचा काळ ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. यानंतर अनेक सेलेब्रिटींनी मोदी यांच्या या घोषणेचे स्वागत केले आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार वागण्याचा सल्ला चाहत्यांना दिलाय.

ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांनीही आगामी तीन आठवडे लॉक डाऊनसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हेमा मालिनी यांनी ट्विटरवर लिहिलंय, आपण देशभर लागू झालेल्या ३ आठवड्याचा लॉक डाऊनचा काळ यशस्वी पूर्ण केला. यातून कोरोनाचे संक्रमण थांबवण्यात आपण यशस्वी झालोय. नरेंद्र मोदीजी यांनी आगामी ३ आठवड्यासाठी लागू केलेल्या लॉक डाऊनला सहकार्य करा. आपल्या भल्यासाठी, कायद्याचे उल्लंघन करु नका.

गीतकार आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी नरेंद्र मोदी यांच्या लॉक डाऊन वाढवण्याच्या घोषणेचे स्वागत केले आहे. या परिस्थितीमध्ये मोदी यांच्या पाठीशी ठाम आणि एकजुटीने राहण्याची गरज असल्याचे जोशी यांनी म्हटलंय.

अभिनेता अर्जुन कपूरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करीत लॉक डाऊनचे समर्थन केलंय.

अभिनेता नील नितीन मुकेश यानेही इन्स्टाग्रामवर ३ मे पर्यंत वाढवण्यात आलेल्या लॉक डाऊनला पाठिंबा दर्शवलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details