मुंबई -बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची जोडी ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. निकचा १६ सप्टेंबरला २७ वा वाढदिवस होता. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, सर्वांचं लक्ष हे प्रियांकाकडे होतं. निकसाठी प्रियांका काय खास गिफ्ट देते, याची चाहत्यांना आतुरता होती. प्रियांकाने निकसाठी एक रोमॅन्टिक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करुन तिने निकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रियांका आणि निकचे काही खास क्षण पाहायला मिळतात. तू माझ्या आयुष्यातील प्रकाश आहे. तुझ्यासोबत माझा प्रत्येक दिवस हा नेहमी वेगळा असतो. जगातील सर्व सुख तुला मिळावे', असे लिहून तिने निकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.