महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रियंका चोप्राने पती निक जोनाससोबत साजरी केली रोमँटिक होळी - निक प्रियंका रोमँटिक होळी

प्रियंका चोप्राने अमेरिकेत तिच्या सासरच्या घरी होळी खेळली. यादरम्यान प्रियांका चोप्रा पूर्ण रोमँटिक मूडमध्ये दिसली. यावेळी तिने पती निकला रंगात रंगवून त्याचे चुंबनही घेतले.

निक प्रियंका रोमँटिक होळी
निक प्रियंका रोमँटिक होळी

By

Published : Mar 19, 2022, 12:05 PM IST

मुंबई- बॉलिवूडमध्ये होळीची मोठी क्रेज असते. चित्रपटाच्या पडद्यावर जितकी होळी दिसते त्याहून जास्त रंग कलाकार आपल्या लोकांसोबत उधळत असतात. बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने देखील लॉस एंजेलिस (यूएसए) येथे तिच्या सासरच्या घरी होळीचा आनंद लुटला. प्रियांका चोप्राने पती निक जोनास आणि त्याचे कुटुंब तसेच मित्रांसह होळीच्या दिवशी खूप रंग उधळले.

निक प्रियंका रोमँटिक होळी

प्रियंका चोप्राने तिच्या सासरच्या घरी होळी साजरी करण्याची एक सुंदर झलक तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या फोटो आणि व्हिडिओमध्ये प्रियांका आणि निकचा होळीचा स्वॅग खूपच रोमँटिक दिसत आहे.

प्रियांका-निकने एकमेकांच्या गालावर गुलाल आणि रंग लावला आणि खास प्रसंगी या जोडप्याने रोमँटिक होऊन एकमेकांचे चुंबन घेत प्रेम व्यक्त केले.

हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत प्रियंका चोप्राने लिहिले आहे की, 'डू मी अ फेवर, चला होळी खेळू, सॉरी, हॅड टू'. मी तुम्हाला सांगतो, 'डू मी अ फेवर, लेट्स प्ले होली', हे प्रियंका चोप्राच्या चित्रपटातील गाणे आहे, जे विशेषतः होळीच्या निमित्ताने सर्वत्र वाजवले जाते.

निक प्रियंका रोमँटिक होळी

प्रियांका चोप्राच्या होळीच्या सेलिब्रेशनचे फोटोंना चित्रपट निर्मात्या झोया अख्तरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पसंत केले आहेत. प्रियांका चोप्रा परदेशी झाली असली तरी ती आपल्या देशाचे संस्कार आमि पारंपरिक सण साजरे करायला कधीही विसरत नाही.

निक प्रियंका रोमँटिक होळी

याआधी प्रियांका चोप्रा पती निक जोनासला भगवान शिवासमोर बसवून महाशिवरात्रीचा सण साजरा करताना दिसली होती. प्रियांकाने महाशिवरात्रीच्या पूजेचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले होते.

प्रियांका आणि निक नुकतेच सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. अशा परिस्थितीत नवजात बाळासह जोडप्याची ही पहिलीच होळी होती, ज्याचा या दाम्पत्याने मनापासून आनंद लुटला.

हेही वाचा -'शांताबाई' गाण्यावर 'आमदार निवास'मध्ये थिरकणार सनी लिओनी

ABOUT THE AUTHOR

...view details