बॉलिवूड अभिनेत्री भारताबाहेर न्यूयॉर्कमध्ये राहात असते. मात्र ती आपला देसी अंदाज विसरलेली नाही. तिचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती बिग बी यांच्या ‘सोना- सोना’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओत प्रियंका निक जोनासच्या मॅनेजरची मुलगी एवा ड्रयू हिच्यासोबत देसी गाण्यावर नाचताना दिसते. प्रियंकाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.