मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत हे सात वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहेत. ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन सर्वांची लाडकी असलेली ही जोडी वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'आणि काय हवं', असे त्यांच्या वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजमध्ये दोघेही ऑनस्क्रिन पतीपत्नीची भूमिका साकारत आहे.
दोघांचीही ही पहिलीच वेबसीरिज आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला. प्रियाने सोशल मीडियावर या वेबसीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे. दोघेही एवढ्या वर्षानंतर सोबत भूमिका साकारणार म्हटल्यावर उत्साह तर असणारंच. 'लय एक्सायटेड' असे कॅप्शन तिने या व्हिडिओवर दिले आहे.