मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताच्या इतिहासामध्ये २५ जून १९८३ तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली आहे. कारण, याच दिवशी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वकरंडक जिंकला होता. याच विजयावर चित्रपटाची कथा आधारित असणार आहे. या चित्रपटाची सोशल मीडियामध्ये बरीच चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक प्रितम हे या चित्रपटाला संगीत देणार आहेत.
रणवीरच्या '८३' चित्रपटासाठी लाभणार प्रितम यांचे संगीत
रणवीरने प्रितम यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करून ही माहीती दिली आहे. प्रितम पहिल्यांदाच रणवीर सिंगच्या चित्रपटाला संगीत देणार आहेत.
रणवीरने प्रितम यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करून ही माहीती दिली आहे. प्रितम पहिल्यांदाच रणवीर सिंगच्या चित्रपटाला संगीत देणार आहेत. रणवीर या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी तो गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेताना दिसत आहे. कपिल देव यांच्यासोबत तो दिल्लीतही १० दिवस राहून प्रशिक्षण घेणार आहे. त्यांचासारखा लूकही त्याने करून घेतला आहे.
'चक दे इंडिया'चे दिग्दर्शक कबीर खान यांनीच '८३'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. २०२० मध्ये १० एप्रिलला उत्तम कथा आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर आणि कपिल देव यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.