मुंबई - प्रसिद्ध नाटककार आणि ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे सोमवारी (१० जून) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बंगळुरु येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवर लिहिलेय, की 'गिरीश कर्नाड यांच्या जाण्याने आज सांस्कृतीक क्षेत्र पोरके झाले आहे'.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'गिरीश कर्नाड नेहमीच सर्वच माध्यमातील अभिनयासाठी स्मरणात राहतील. त्यांचे काम येणाऱ्या काळात अधिक लोकप्रिय होत राहिल. त्यांच्या जाण्याने फार दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो', असे ट्विट त्यांनी केले आहे.