महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Indian Idol Marathi : स्पर्धक प्रतिक सोळसे करणार 'झिंगाट परफॉर्मन्स' ची दुसरी हॅट्रिक? - अजय अतुल परिक्षक

सोनी मराठीवर सुरु झालेला ‘इंडियन आयडल मराठी’ ( Indian Idol Marathi ) हा सांगीतिक कार्यक्रम सुरुवातीपासूनच त्यातील बहारदार परफॉर्मन्सेसमुळे प्रेक्षकांचा आवडता शो बनला आहे. नाशिकच्या निफाडचा प्रतिक सोळसे त्याच्या दमदार आवाजाने परिक्षकांची मनं जिंकतो आहे.

pratik solase
pratik solase

By

Published : Jan 21, 2022, 10:55 AM IST

इंडियल आयडॉल मराठी

मुंबई -सोनी मराठीवर सुरु झालेला ‘इंडियन आयडल मराठी’ ( Indian Idol Marathi ) हा सांगीतिक कार्यक्रम सुरुवातीपासूनच त्यातील बहारदार परफॉर्मन्सेसमुळे प्रेक्षकांचा आवडता शो बनला आहे. अजय-अतुल सारखी लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. 'इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. महाराष्ट्राला टॉप १० स्पर्धक मिळाले असून विजेतेपदासाठी सूरांची टक्कर बघायला मिळत आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरु झाली आहे.

नाशिकच्या निफाडचा प्रतिक सोळसे त्याच्या दमदार आवाजाने परिक्षकांची मनं जिंकतो आहे. प्रतिकची दमदार गाणी प्रेक्षकांना नेहमीच आवडत आली आहेत. प्रतिकची आत्ताच झिंगाट परफॉर्मन्सची हॅट्रिक झाली होती आणि या लोकसंगीत विशेष आठवड्यातही त्याला झिंगाट मिळाला आहे. दुसऱ्या हॅट्रिककडे त्याची वाटचाल आता सुरु झाली आहे. लोकसंगीत विशेष आठवड्यात प्रतिकने छत्रपती शिवाजी महाराजांना पोवाड्यातून मानाचा मुजरा दिला. खुद्द गायक नंदेश उमप यांनी प्रतिकच्या सादरीकरणाचं आणि आवाजाचं कौतुक केलं. दुसऱ्या हॅट्रिकडे प्रतिकची वाटचाल सुरु झाली असून येणाऱ्या आठवड्यात तो त्याच्या सादरीकरणाने परीक्षकांची मनं जिंकू शकेल का ही उत्सुकतेची बाब आहे.
हेही वाचा -बालविवाहातून सुटका करुन सुपरमॉडेल बनलेल्या निशा यादवची 'चित्तरकथा' !!

ABOUT THE AUTHOR

...view details