महाराष्ट्र

maharashtra

प्रथमेश परब सिनेमासाठी होणार 'टल्ली'

प्रथमेश परबच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावरून रिव्हील केले आहे. ‘टल्ली’ या 2020 ला रिलीज होणाऱ्या सिनेमात प्रथमेश परब मुख्य भुमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या नावामुळे सध्या  सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

By

Published : Nov 1, 2019, 4:59 PM IST

Published : Nov 1, 2019, 4:59 PM IST

'टल्ली'चे पोस्टर रिलीज

अभिनेता प्रथमेश परबने नुकतेच आपल्या आगामी चित्रपटाचे टाइटल पोस्टर सोशल मीडियावरून रिव्हील केले आहे. झेब्रा एंटरटेन्मेंटच्या ‘टल्ली’ या 2020 ला रिलीज होणाऱ्या सिनेमात प्रथमेश परब मुख्य भुमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या नावामुळे सध्या सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

झेब्रा एंटरटेन्मेंट या प्रोडक्शन हाऊसचे निर्माते संजय गोळपकर याविषयी म्हणाले, 'आमच्या निर्मिती संस्थेची टल्ली ही पहिली फिल्म आहे. नावाप्रमाणेच हा सिनेमा धमाल विनोदी चित्रपट असणार आहे. यात प्रथमेश परबचे नाव 'टल्ली' आहे. आता ज्याचे नावच 'टल्ली' असेल, अशा हिरोवर जेव्हा सिनेमा बनेल, तर तो किती विनोदी असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.'

अभिनेता प्रथमेश परब म्हणतो, 'माझ्या आजवरच्या विनोदी भूमिकांना आणि चित्रपटांना महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. टल्ली सिनेमा जरी विनोदी असला, तरीही ह्या सिनेमात विनोदाला समाज प्रबोधनाची झालर आहे. या सिनेमात पहिल्यांदाच माझी ओळख करून देताना नावाअगोदर ‘in & as’ प्रथमेश परब असे दिसेल. कोणत्याही अभिनेत्याच्या कारकिर्दीत अशी ओळख होणे, ही मानाची गोष्ट असते. या सिनेमात माझा लूकही वेगळा असणार आहे. सिनेमासाठी माझं फिजीकल ट्रेनिंगही लवकरच सुरू होईल.'

टल्लीमधून संगीत दिग्दर्शक गणेश-सुरेश दिग्दर्शनात पहिलं पाऊल ठेवतायत. ते म्हणाले, 'जरी सिनेमाचे नाव टल्ली असले तरीही, संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल, असा हा निखळ मनोरंजक सिनेमा असेल. सध्या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरू आहे. लवकरच चित्रपटाचे शूटिंगही सुरू होईल. पुढच्या वर्षी अभिनेता प्रथमेश परबसोबत मनोरंजनाची ही पर्वणी आम्ही घेऊन येऊ.'

झेब्रा एंटरटेन्मेंट निर्मित गणेश-सुरेश दिग्दर्शित टल्ली सिनेमात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून सिनेमाच्या इतर कलाकारांविषयीची लवकरच घोषणा होईल, हा विनोदी चित्रपट 2020 मध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details