मुंबई- अभिनेता प्रभासने आपल्या संग्रहात आणखी एक लक्झरी कार दाखल केली आहे. प्रभासने लॅम्बोर्गिनी अॅव्हेंटोर एस रोडस्टर ही महागडी गाडी घरी आणली असून त्याची किंमत अंदाजे 6 कोटी रुपये आहे.
प्रभासचा ही लक्झरी कार चालवणारा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अभिनेत्याकडे आधीपासूनच बीएमडब्ल्यू 520 डी, इनोव्हा क्रिस्टा, जग्वार एक्सजेएल आणि रेंज रोव्हर वोग यासारख्या लक्झरी कार आहेत. लॅम्बोर्गिनी ही भारतीय सेलिब्रिटींपैकी सर्वात लोकप्रिय मोटार गाड्यांपैकी एक आहे. प्रभासच्या चाहत्यांना यामुळे आनंद झाला असून त्यांनी ट्विटरवर 'लॅम्बोर्गिनी' हा ट्रेंड सुरू केलाय.