मुंबई - पूजा भट्ट हिने इन्स्टाग्रामवर महिलांकडून सायबर छळाची तक्रार केली आहे. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर पूजाने आपले अकाऊंटही खासगी केले आहे.
पूजाने लिहिले की, "हिंसाचार / शिवीगाळ करीत धमकी देणारे लोक, धमकी देत म्हणातात की तुम्ही मरुन का नाही जात आहात, असे वाटते की इन्स्टाग्रामवर ही एक प्रथा बनली आहे. तक्रार करायला गेले तर इन्स्टाग्रामवर अधिकवेळा असे उत्तर देते की, असी तक्रार त्यांच्या नियमांत बसत नाही. ट्विटरवर याहून अधिक चांगले, उत्तम गाईडलाइन्स आहेत."
पूजा भट्टने तिच्या अधिकृत ट्विटरवरुन दोन वेगवेगळ्या ट्विटमधून सांगितले की, ''याहून वाईट गोष्ट ही आहे की जास्तीत जास्त मेसेजीस हे शिव्या देणारे आहेत आणि महिलांकडून पाठवले जातात. जा मारुन जा किंवा तू स्वतःला मारुन का टाकत नाहीस, असे हे मेसेज असतात. इन्स्टाग्रामवर अशा प्रकारचा छळ करणे हा गुन्हा आहे.''
आपल्याला माहिती असेल की 'सड़क 2' च्या ट्रेलरला सर्वाधिक डिसलाईक मिळालेले होते. यासोबत चित्रपटातील गाण्यांचीही तीच अवस्था होती. यावर पूजाने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ''यामुळे काहीच फरक पडत नाही."
त्याचबरोबर सायबर गुंडगिरीला बळी पडणार्या बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनीही त्याविरोधात आवाज उठविला आहे.