नवी दिल्ली - बॉलिवूडमध्ये सध्या विकी कौशलच्या 'उरी' चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट 'उरी' येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदल्यावर आधारित आहे. या चित्रपटातील 'Hows the josh' हा नाराही प्रचंड गाजला. एवढंच काय, तर संसदेत सुरू असलेल्या बजेट भाषणादरम्यानही हा नारा गाजला. यावेळी पियुष गोयल यांनी मनोरंजन जगतातील बजेटबाबत काय निर्णय घेतले आहेत, याची माहिती दिली आहे.
Budget 2019 : अर्थमंत्र्यांकडून उरीचा उल्लेख.. भाजप खासदार म्हणाले 'Hows the josh' - vicky koushal
यावेळी पियुष गोयल यांनी मनोरंजन जगतातील बजेटबाबत काय निर्णय घेतले आहेत, याची माहिती दिली आहे.
पियूष गोयल यांनी सांगितले, की 'मनोरंजन क्षेत्रामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाले आहे. चित्रपटाची होणारी पायरसी थांबविण्याकरताही अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांकरता सरकारने 'सिंगल विंडो क्लियरंस'चा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे चित्रपट उद्योग वाढण्यास मदत होणार आहे.
'उरी' चित्रपटाबाबतही त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. संसदेत 'उरी' चित्रपटाचा विषय निघताच मंत्री राज्यवर्धन राठोडसहीत अनेकांनी 'Hows the josh'चे नारे लगावले. या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या परेश रावल यांनाही स्क्रिनवर पाहण्यात आले. या चित्रपटात त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भूमिका साकारली आहे.
अभिनेत्री किरण खेर यांनीही यावेळी नारे दिले.