मुंबई -बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर आणि पोस्टर यापूर्वीच प्रदर्शित झाले होते. हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे.
'पल पल दिल के पास' प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा नवं पोस्टर - पल पल दिल के पास
सनी देओलचा मुलगा करण बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पल पल दिल के पास' प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा नवं पोस्टर
'पल पल दिल के पास' हा एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. या चित्रपटातून करण देओल आणि साहिर लांबा दोघेही बॉलिवूड पदार्पण करत आहेत.
सनी देओलनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.