महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जिमी शेरगीलचा 'प से प्यार, फ से फरार' करणार 'ऑनर किलिंग'वर भाष्य

बऱ्याचदा ऑनर किलिंगसारख्या धक्कादायक घटना आपल्या समाजात घडत असतात. २ मिनीट ३६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्येही 'ऑनर किलिंग'चा थरार पाहायला मिळतो.

'ऑनर किलिंग'वर भाष्य करणारा चित्रपट घेऊन जिमी शेरगील येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By

Published : Sep 5, 2019, 11:06 AM IST

मुंबई -बॉलिवूडमध्ये सध्या समाजातील गंभीर विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. आता अभिनेता जिमी शेरगीलदेखील अशाच एका गंभीर आशयावर आधारित असलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'प से प्यार, फ से फरार' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून 'ऑनर किलिंग'सारख्या गंभीर विषयावर भाष्य करण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

बऱ्याचदा ऑनर किलिंगसारख्या धक्कादायक घटना आपल्या समाजात घडत असतात. २ मिनीट ३६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्येही 'ऑनर किलिंग'चा थरार पाहायला मिळतो.

हेही वाचा-कलाक्षेत्रातही दहशत निर्माण करतंय सरकार, नाटककार जयंत पवारांचा आरोप

या चित्रपटाचं दिग्दर्शन मनोज तिवारी यांनी केलं आहे. या चित्रपटातून भावेश कुमार हा नवोदित अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिमी शेरगीलसोबत संजय मिश्रा, गिरीश कुलकर्णी आणि कुमुद मिश्रा यांच्याही भूमिका असणार आहे.

१८ ऑक्टोंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-जोकर सिनेमानं रचला इतिहास, ट्रेलरला आठ मिनिटे मिळाली स्टँडिंग ओव्हेशन

ABOUT THE AUTHOR

...view details