महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूडचे केंद्र असलेल्या वांद्रेमध्ये यंदा मतदानाचा उत्साह दिसणार का? - bollywood voting center

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, दिग्दर्शक सुभाष घई, संगीतकार प्यारेललजी, ज्येष्ठ लेखक सलीम खान, अभिनेता सलमान खान, शाहरुख खान हे या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येत असतात. यावेळीही या केंद्रावर मतदानाचा उत्साह दिसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बॉलिवूडचे केंद्र असलेल्या वांद्रेमध्ये यंदा मतदानाचा उत्साह दिसणार का?

By

Published : Oct 21, 2019, 8:22 AM IST

मुंबई -विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांचं निवासस्थान असलेल्या वांद्रे पश्चिम येथील सेंट मेरी हायस्कुल हे प्रत्येक निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी असते. येथे अभिनेत्री रेखा, दिग्दर्शक सुभाष घई, संगीतकार प्यारेललजी, ज्येष्ठ लेखक सलीम खान, अभिनेता सलमान खान, शाहरुख खान हे या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येत असतात. यावेळीही या केंद्रावर मतदानाचा उत्साह दिसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

यंदा रेखा मुंबईत नसल्याने विधानसभा निवडणुकीसाठी त्या मतदान करू शकणार नाही, अशी चर्चा आहे. तर, या भागातील अतिश्रीमंत वर्ग मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत येतो का यांचीही उत्सुकता कायम आहे.

बॉलिवूडचे केंद्र असलेल्या वांद्रेमध्ये यंदा मतदानाचा उत्साह दिसणार का ?

हेही वाचा - मतदान करा फरक पडतो, मराठी सेलिब्रिटींचं मतदारांना आवाहन

मुंबईत गेले दोन दिवस रिमझिम पाऊस सुरू असला तरीही आज सकाळपासून पावसाने काहीशी उघडीप दिलेली आहे.

हेही वाचा -राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

ABOUT THE AUTHOR

...view details