महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोणी शाह, सुल्तान भारताची एकता तोडू शकत नाही - कमल हासन - कमल हासन यांनी एक व्हिडिओ शेअर करीत अमित शाह यांच्यावर शरसंधान साधले

आता देशाला एका भाषेची गरज असल्याचे विधान अमित शाह यांनी केले होते. त्यावर तामिळनाडूत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कमल हासन यांनीदेखील व्हिडिओ शेअर करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कमल हासन

By

Published : Sep 16, 2019, 9:44 PM IST


चेन्नई - हिंदी भाषेसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या भूमिकेवर अभिनेता कमल हासन यांनी टीका केली आहे. भारताच्या विविधतेतील एकतेला कोणीही शाह, सुल्तान किंवा सम्राट आव्हान देऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटलंय

गेल्या दोन दिवसापासून तामिळनाडूतील राजकीय पक्ष अमिता शाह यांच्या विधानानंतर आंदोलन करीत आहेत. हिंदी दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडण्याचे आवाहन केले. वेगवेगळ्या भाषा, पोटभाषा आणि बोली भाषा या आपल्या देशाची शक्ती आहेत. मात्र आता देशाला एका भाषेची गरज आहे. जेणेकरून परेदशी भाषांना भारतामध्ये स्थान मिळणार नाही, असे अमित शाह एका कार्यक्रमामध्ये म्हणाले होते. त्यानंतर दक्षिणेतील प्रादेशिक राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.

कमल हासन यांनी एक व्हिडिओ शेअर करीत अमित शाह यांच्यावर शरसंधान साधले आहे. ''भारत जेव्हा प्रजासत्ताक बनला तेव्हा विविधतेतील एकतेचे वचन आम्हाला मिळाले. आता कोणीही शाह, सुल्तान अथवा सम्राट या वचनापासून मागे हटू शकत नाही. इतर भाषांचा आम्ही आदर करतो मात्र आमच्या मातृभाषेचा सन्मान राखल गेला पाहिजे.'', असे हासन म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, "जळ्ळीकट्टू हे फक्त आंदोलन होते. आमच्या भाषेसाठीचा संघर्ष त्याहून अधिक तीव्र असेल. भारत किंवा तामिळनाडूला अशा संघर्षाची गरज नाही.''

"संपूर्ण देश राष्ट्रगीत बंगालीत असूनही अभिमानाने गातो आणि गात राहील. त्याचे कारण म्हणजे कवि यांनी राष्ट्रगीतात सर्व भाषा आणि संस्कृतीचा आदर राखला आहे.", असेही ते म्हणाले.

एक देश एक भाषा अशा प्रकारचा मुर्खपणा करु नका असे आवाहनही कमल हासन यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details