मुंबई- स्वप्निल जोशीचा 'मोगरा फुलला' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून स्वप्निलची नवी भूमिका चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मनमोहिनी, असं या गाण्याचं शीर्षक आहे.
'मनमोहिनी'! 'मोगरा फुलला' चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित - swapnil joshi
गाण्यात स्वप्निल आणि सई देवधर यांचं निसर्गाच्या सानिध्यात खुलत जाणारं प्रेम पाहायला मिळत आहे. या गाण्याला रोहित शाम राऊत यांनी आवाज दिला आहे
गाण्यात स्वप्निल आणि सई देवधर यांचं निसर्गाच्या सानिध्यात खुलत जाणारं प्रेम पाहायला मिळत आहे. या गाण्याला रोहित शाम राऊत यांनी आवाज दिला आहे. तर अभिषेक खानकर यांनी हे गाणं लिहिलं आहे आणि रोहित शाम राऊत यांनीच गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटात साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, संदीप पाठक, आनंद इंगळे, सुहिता थत्ते, समिधा गुरू, विघ्नेश जोशी, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. श्रावणी देवधर यांच्या या सिनेमातून कौटुंबीक जबाबदाऱ्या पार पाडता पडता लग्नाचं वय सरून गेलेल्या एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली आहे. १४ जूनला हा सिनेमा रिलीज होईल.