महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'स्टार प्रवाह'वर नवा सिंगिंग रिअ‌ॅलिटी शो 'मी होणार सुपरस्टार' - reality show mi honar superstar start

आदर्श शिंदे, राहुल देशपांडे, मृणाल कुलकर्णी या कार्यक्रमाचे परीक्षण करताना दिसणार आहेत. १२ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून हा ग्रँड सोहळा अनुभवता येईल.

New singing reality show mi honar superstar start on star prawah
'स्टार प्रवाह'वर नवा सिंगिंग रिअ‌ॅलिटी शो 'मी होणार सुपरस्टार'

By

Published : Jan 5, 2020, 1:09 PM IST

मुंबई -'स्टार प्रवाह' वाहिनीवर येत्या १२ जानेवारी पासून नवा सिंगिग रिअ‌ॅलिटी शो सुरू होणार आहे. 'मी होणार सुपरस्टार' या शो मधून गायनाचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच मिका सिंग, शान, सुखविंदर सिंग, उदित नारायण, शाल्मली खोलगडे आणि नकाश अझीझ हे या कार्यक्रमातील स्पर्धकांना परीक्षकांसमोर नॉमिनेट करणार आहेत.

आदर्श शिंदे, राहुल देशपांडे, मृणाल कुलकर्णी या कार्यक्रमाचे परीक्षण करताना दिसणार आहेत. १२ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून हा ग्रँड सोहळा अनुभवता येईल. दिग्गजांचे जबरदस्त सादरीकरण आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोधलेलं अफलातून टॅलेण्ट असा सुरेख मेळ या शोच्या निमित्ताने जुळून आला आहे. त्यामुळे १२ जानेवारीचा रविवार प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे.

'स्टार प्रवाह'वर नवा सिंगिंग रिअ‌ॅलिटी शो 'मी होणार सुपरस्टार'

हेही वाचा -'तत्ताड' सिनेमाचं पहिलं लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित, तगडी स्टारकास्ट

या ग्रॅण्ड प्रीमियरनंतर दर शनिवार आणि रविवारी ९ वाजता ‘मी होणार सुपरस्टार’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावरचा अनुभव सांगताना सुप्रसिद्ध गायक शान म्हणाला, ‘मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे आणी ती बोलताना खूप आपलेपणा जाणवतो. शाळेत असताना माझा मराठी हा आवडता विषय होता आणि इतर विषयांपेक्षा सर्वात जास्त मार्क्स मला मराठीमध्ये मिळायचे. स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या शोच्या पहिल्या भागासाठी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी लगेच होकार दिला. या मंचावर मी मराठी गाणीही गायली आहेत. खास बात म्हणजे शोची संकल्पना मला खूपच भावली. आयुष्यात दुसरी संधी फार कमी जणांना मिळते. त्यामुळे या कार्यक्रमातून देण्यात आलेल्या संधीचा स्पर्धकांनी पुरेपूर फायदा घ्यायला हवा'.

हेही वाचा -'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'त पाहणे एक अनोखा अनुभव - वरुण धवन

शानला मिळालेल्या दुसऱ्या संधीचा किस्साही त्याने सांगितला. 'मला मला लहानपणापासून गाण्याची खूप आवड होती. मी जिंगल्सही गायचो. मात्र, वयाच्या १२ व्या वर्षी माझा आवाज बदलला. तो पूर्वीसारखा होणार नाही असंच मला वाटलं. दोन तीन वर्षांच्या रियाजानंतर मला माझा पूर्वीसारखा आवाज परत मिळाला. ही गोष्ट ऐकून विश्वास बसणार नाही. मात्र, आयुष्याने मला दिलेली ही दुसरी संधीच होती'.

हेही वाचा -अनुपम खेरचे टिक टॉक पदार्पण, शेअर केला पहिला व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details