मुंबई- विद्युत जामवाल लवकरच 'जंगली' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विद्युत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ज्यात विद्युत जबरदस्त स्टंट साकारताना दिसत होता. आता या चित्रपटातील एक नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
विद्युतच्या 'जंगली'चं आणखी एक नवं पोस्टर प्रदर्शित - movie
'जंगली' चित्रपटात विद्युतचे हत्तीसोबत असलेले घनिष्ठ नाते उलगडण्यात येणार आहे. चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये विद्युतचा अॅक्शन सीन पाहायला मिळत आहे.
'जंगली' चित्रपटात विद्युतचे हत्तीसोबत असलेले घनिष्ठ नाते उलगडण्यात येणार आहे. चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये विद्युतचा अॅक्शन सीन पाहायला मिळत आहे. यासोबतच चित्रपटाच्या इतर पोस्टरप्रमाणेच हत्तीची झलकही पाहायला मिळत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी हा फोटो शेअर केला आहे.
जंगली चित्रपट २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक शक रसेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर विनीत शर्मा आणि प्रिती सहानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात विद्युतशिवाय पुजा सावंत, आशा भट्ट आणि अतुल कुलकर्णी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.