महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वाढदिवशी आलियाचा 'कलंक'मधील खास लूक चाहत्यांच्या भेटीस - varun dhawan

आलिया लवकरच 'कलंक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूकही काही दिवसांपूर्वीच शेअर करण्यात आला होता

आलिया भट्ट

By

Published : Mar 15, 2019, 3:02 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज २६ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आलियाचा 'कलंक' चित्रपटातील खास लूक शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही एक उत्तम भेटवस्तू ठरेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


आलिया लवकरच 'कलंक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूकही काही दिवसांपूर्वीच शेअर करण्यात आला होता. आता तिचा आणखी एक खास फोटो चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात आलिया रूप नावाचे पात्र साकारणार आहे.


अभिषेक वर्मन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहरची निर्मिती आहे. चित्रपटात आलियाशिवाय वरूण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त अशी तगडी स्टारकास्टही असणार आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details