मुंबई- राजकारणातील नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही आता बॉलिवूडकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यापाठोपाठ आता मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याचे काही पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
'पीएम मोदी' बायोपिकमधील विवेक ओबेरॉयचे ९ नवे लूक प्रदर्शित - biopic
या बायोपिकमधील विवेक ओबेरॉयचे मोदींच्या भूमिकेतील वेगवेगळे ९ लूक शेअर करण्यात आले आहेत.चित्रपटात मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत झळकणार आहेत
अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात नरेंद्र मोदींच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. आता या बायोपिकमधील विवेक ओबेरॉयचे मोदींच्या भूमिकेतील वेगवेगळे ९ लूक शेअर करण्यात आले आहेत.
उमंग कुमार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर संदीप सिंग, सुरेश ओबेरॉय आणि आनंद पंडित यांची निर्मिती असणार आहे. या चित्रपटात मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाशिवाय मोदींच्या जीवनावर आधारित वेबसीरिजही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.