मुंबई- अभिषेक वर्मन यांचे दिग्दर्शन असलेला 'कलंक' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक आणि दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता चित्रपटातील माधुरी दीक्षितची नवी झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'कलंक'मधील बहार बेगमचा खास लूक प्रदर्शित; पाहा फोटो - alia bhatt
माधुरी या चित्रपटात बहार बेगमचे पात्र साकारणार आहे. या फोटोत ती लाल रंगाच्या लेहंग्यात दिसत असून तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. तिचा हा खास फोटो प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे
माधुरी या चित्रपटात बहार बेगमचे पात्र साकारणार आहे. या फोटोत ती लाल रंगाच्या लेहंग्यात दिसत असून तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. तिचा हा खास फोटो प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. माधुरीशिवाय या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
करण जोहरची निर्मिती असलेल्या या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने आलिया आणि वरूण धवन चौथ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.