नागपूर - शहरातील मानकापूर इंडोअर स्टेडीयम येथे प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. नागपूर शहर पोलीस विभागातर्फे पोलीस कल्याण निधी गोळा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नेहाने सप्त सुरांची उधळण केल्याने नागपूरकर संगीत रसात नाहून निघाले.
नागपुरात रंगला नेहा कक्कर लाईव्ह कॉन्सर्ट - पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय
नेहा कक्कर लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अनेक सिनेकलाकार सहभागी झाले होते. यामध्ये उर्वशी रौतेला, हास्य कलावंत वरुण शर्मा, कुणाल पंडित, दिव्यांका त्रिपाठी यांचा समावेश होता.
नेहा कक्कर लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अनेक सिनेकलाकार सहभागी झाले होते. यामध्ये उर्वशी रौतेला, हास्य कलावंत वरून शर्मा, कुणाल पंडित, दिव्यांका त्रिपाठी यांचा समावेश होता. यावेळी नेहाने गायलेल्या 'मिले हो तुम हमको बडे नसीबोसे' आणि 'हाय रे नखरा तेरा नी', या गाण्यांनी वातावरण निर्मिती केली होती. त्यानंतर एकापाठोपाठ एक सादर झालेल्या परफॉर्मन्स मुळे नागपूरकरांचे चांगलेच मनोरंजन झाले.
यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह नागपूर पोलीस शहर दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेले पैसे पोलीस कल्याण निधीच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे.