महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नेहा आणि सोहाच्या मैत्रीत फूट? इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्यामागे 'हे' आहे कारण - #फ्रेंडस अनप्लग्ड

अचानक असं काय झालं की दोघींच्या एवढ्या घट्ट मैत्रीत फूट पडली, असा प्रश्न चाहत्यांनी विचारल्यानंतर दोघींनीही यामागचं कारण उलगडलं आहे.

नेहा आणि सोहाच्या मैत्रीत फूट? इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्यामागे 'हे' आहे कारण

By

Published : Aug 4, 2019, 9:32 PM IST

मुंबई - एकीकडे कलाविश्वातील बरेचसे कलाकार आपल्या मित्र-मैत्रिणींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. तर, दुसरीकडे मात्र, बॉलिवूडमधल्या दोन जिवलग मैत्रिणी अभिनेत्री नेहा धुपिया आणि सोहा अली खान यांनी एकमेकींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. मात्र, अचानक असं काय झालं की दोघींच्या एवढ्या घट्ट मैत्रीत फूट पडली, असा प्रश्न चाहत्यांनी विचारल्यानंतर दोघींनीही यामागचं कारण उलगडलं आहे.

खरंतर आधुनिक युगात मैत्रीचे खरे व्यासपीठ हे सोशल मीडिया बनले आहे. सोशल मीडियावर बरेच जण आपली मैत्री व्यक्त करतात. मात्र, नेहा आणि सोहा यांनी त्यांच्या मैत्रीची सुरुवात पुन्हा नव्याने '#फ्रेंडस अनप्लग्ड' द्वारे सुरू केली आहे.

आता हे '#फ्रेंडस अनप्लग्ड' काय आहे?
खरंतर सोहा अली खान आणि नहा धुपिया दोघीही मैत्रीदिनाच्या पर्वावर वोडाफोन इंडियाचे प्रमोशन करत आहेत. या थीमनुसार, मित्र-मैत्रिणींनी फक्त सोशल मीडियावर न भेटता खऱ्या आयुष्यात एकमेकांना वेळ दिला पाहिजे. त्यामुळे दोघींनीही इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केले आहे.

नेहा आणि सोहा दोघींनीही व्हिडिओद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे मैत्रीच्या पर्वावर दोघींनीही धक्कादायक मात्र, मजेशीर अंदाजात चाहत्यांना 'मैत्रीदिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details