महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांचं ‘पोरगं मजेतय’!

By

Published : Mar 6, 2021, 7:55 PM IST

दिग्दर्शक मकरंद माने आणि अभिनेते शशांक शेंडे पुन्हा एकदा नवी कलाकाृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘पोरगं मजेतय’ असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. या चित्रपटातून बाप लेकाच्या नात्याचा हा भावनिक प्रवास प्रत्येकालाच समृद्ध करणारा अनुभव मिळेल असा विश्वास मकरंद माने यांनी व्यक्त केलाय.

Porang Majetay
‘पोरगं मजेतय’

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांशी घनिष्ठ संबंध असलेले दिग्दर्शक मकरंद माने आणि अभिनेते शशांक शेंडे पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण कलाकृती घेऊन मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘रिंगण’,‘कागर’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या मातीतले, रोजच्या जगण्यातले विषय दिग्दर्शक मकरंद माने यांनी हाताळले असून उत्तम संहिता आणि कलाकार-तंत्रज्ञ यांची सांगड घालून ते पुन्हा एका नव्या कलाकृतीसह सज्ज झाले आहेत. चित्रपटाचे हटके नाव, ‘पोरगं मजेतय’ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून आपल्या अवतीभवती घडणारी अगदी साधी, सोपी सरळ गोष्ट तेवढ्याच प्रभावीपणे दिग्दर्शकाने मांडली आहे.

पोस्टर
कुठल्याही प्रकारचा बडेजाव नसलेला चित्रपट आपल्या उत्कृष्ट कथाकथन शैलीत मांडणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांनी बाप लेकाच्या नात्याचा हा भावनिक प्रवास प्रत्येकालाच समृद्ध करणारा अनुभव असेल असा विश्वास व्यक्त केलाय. मानवी भावभावना, नातेसंबंध याविषयीच्या कुतूहलातून त्याच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांना अधोरेखित करणारे अनेक चित्रपट आजवर रुपेरी पडद्यावर आले आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. वडिल आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यातील संवाद-विसंवाद याचा सुरेख मेळ ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून साधला आहे.
दिग्दर्शक मकरंद माने
‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे. ध्वनी आरेखन पियुष शहा यांचे आहे. वेशभूषा अनुत्तमा नायकवडी तर कलादिग्दर्शन महेश कोरे यांचे आहे. रंगभूषा संतोष डोंगरे, नृत्यदिग्दर्शन मकरंद माने व विश्वास नाटेकर यांचे आहे. कास्टिंग योगेश निकम यांनी केले आहे. प्रोडक्शन हेड मंगेश जगताप आहेत तर कार्यकारी निर्माते आहेत शंतनू गंगणे.
‘पोरगं मजेतय’ टीम
‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेला ‘पोरगं मजेतय’ ची ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मधील मराठी चित्रपट विभागामध्ये नुकतीच निवड करण्यात आली आहे. वडिल आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यातील संवाद-विसंवाद याचा सुरेख मेळ ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून साधला आहे.विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ‘पोरगं मजेतय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हेही वाचा - अभिनेत्री सुलोचना लाटकर दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित का? सरकारला सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details