महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अजय देवगनच्या 'मैदान' चित्रपटातून किर्ती सुरेशची माघार, आता 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका - #PriyaMani

या चित्रपटात सुरुवातीला किर्ती सुरेश ही अभिनेत्री भूमिका साकारणार होती. मात्र तिने या चित्रपटातून माघार घेतली आहे.

National Award winning actress Priya Mani paired opposite Ajay Devgn in Maidaan
अजय देवगनच्या 'मैदान' चित्रपटातून किर्ती सुरेशची माघार, आता 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका

By

Published : Jan 18, 2020, 8:54 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सध्या त्याच्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार करत दमदार यश मिळवले आहे. या चित्रपटानंतर अजय 'मैदान' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सुरुवातीला किर्ती सुरेश ही अभिनेत्री भूमिका साकारणार होती. मात्र तिने या चित्रपटातून माघार घेतली आहे.

'मैदान' चित्रपटात आता अजय देवगनसोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रिया मनी ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अजय देवगनने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

हेही वाचा -चंकी पांडेच्या विनोदांचा मराठी तडका, पाहा 'विकून टाक'चा धमाल ट्रेलर

प्रिया मनीने आत्तापर्यंत ५० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटातही तिने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत भूमिका साकारली होती. प्रिया मनीची 'फॅमिली मॅन' या वेबसीरिजमधील भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

प्रिया मनी

'मैदान' हा चित्रपट फुटबॉल खेळाडूवर आधारित आहे. अजय देवगन यामध्ये फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. अमित रविंद्रनाथ शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, झी स्टुडिओ, बोनी कपूर, आकाश चावला आणि अरूणा जॉय सेनगुप्ता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
२७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -सारा - कार्तिकमध्ये नेमकं सुरू तरी काय? 'लव्ह आज कल'च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान उलगडलं गुपीत

ABOUT THE AUTHOR

...view details