मुंबई - 'उत्तर शोधलं की जगणं बदलतं', अशी दमदार टॅगलाईन असलेला 'कोण होणार मराठी करोडपती' शो नुकताच छोट्या पडद्यावर सुरू झाला आहे. शरद जाधव नावाच्या एका स्पर्धकाच्या आईचे स्वप्न या कार्यक्रमामुळे पूर्ण होणार आहे. खुद्द नागराज मंजुळे यांनी त्याच्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
स्वप्नांची पूर्तता करणारा खेळ, अशी ओळख असणाऱ्या या कार्यक्रमात खरंच स्वप्न पूर्ण करण्याचा किस्सा घडला आहे. शरद जाधव या स्पर्धकाने त्यांच्या आईची म्हणजेच सुवर्णा जाधव यांची एकदा तरी विमान प्रवास करण्याची इच्छा या मंचावर व्यक्त केली होती. ही इच्छा नागराज पूर्ण करतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले होते.