मुंबई- राज्यातील सांगली आणि कोल्हापुरसारख्या जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपूर्वी महापुराने हाहाकार घातला होता. या पुरामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुराचे पाणी ओसरताच येथील नागरिकांनी पुनर्वसनास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत अनेकजण त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
पूरग्रस्तांच्या मदतीला नागराज आला धावून, दिली इतकी रक्कम - आमिर खान
पुराच्या पाण्यात वाहून गेलेला संसार पुन्हा एकदा उभा करण्यासाठी कलाकारही आपल्या परीनं शक्य तितकी मदत या नागरिकांना करत आहेत. या यादीत आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचाही समावेश झाला आहे.
पुराच्या पाण्यात वाहून गेलेला संसार पुन्हा एकदा नव्याने उभा करण्यासाठी कलाकारही आपल्या परीनं शक्य तितकी मदत या नागरिकांना करत आहेत. या यादीत आता सैराट आणि फँड्रीसारख्या सिनेमांचे दिग्दर्शक असलेल्या नागराज मंजुळे यांचाही समावेश झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. नागराजने पुरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत केली असून मुख्यमंत्र्यांनी या मदतीसाठी नागराजचे आभार मानले आहेत. याआधी अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, लता मंगेशकर आणि आमिर खानसारख्या कलाकारांनीही पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.