हैदराबाद : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर दक्षिण अभिनेता नागा चैतन्यने यावर मौन सोडले आहे. या जोडप्याने 2021 मध्ये त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. या जोडप्याच्या घटस्फोटाची अनेक कारणे समोर आली आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आता नागा चैतन्य सामंथासोबतच्या घटस्फोटावर उघडपणे बोलला आहे.
आजकाल नागा त्याच्या 'बंगाराजू' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे आणि अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या घटस्फोटाबद्दलचा खुलासा केला आहे. नागा चैतन्य म्हणाला, ''वेगळं होणं ठीक आहे, दोघांनाही स्वतःच्या आनंदासाठी ते योग्य होते, जर ती आनंदी असेल तर मीही आनंदी आहे. अशा परिस्थितीत विभक्त होण्याचा निर्णय योग्य होता.''
यापूर्वी सामंथा रुथ प्रभूनेही घटस्फोटावर ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ''मला वाटते मी यावर अनेकदा बोलले आहे. याबद्दल बोलणे आवश्यक होते आणि मी बोललेही. परंतु आता मला वाटत नाही यावर पुन्हा पुन्हा बोलावे.'