अमरावती - 'नाळ' चित्रपटातून प्रसिद्धीस आलेल्या श्रीनिवास पोकळेला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'जाऊ दे नं वं' गाण्यातून आपल्या अभिनयाने 'चैत्या' म्हणजेच श्रीनिवासने चाहत्यांवर छाप पाडली होती. त्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यांनी केलं होतं.
'नाळ' फेम श्रीनिवासच्या अभिनयावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर, 'अशी' दिली प्रतिक्रिया - shrinivas pokale
राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यावर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनीधींनी श्रीनिवासशी संवाध साधला. यावेळी श्रीनिवासने आपला आनंद व्यक्त केला. आपल्यासोबतच आपल्या आईवडिलांनाही खूप आनंद झाल्याचे यावेळी श्रीनिवासने सांगितले.
'नाळ' फेम श्रीनिवासच्या अभिनयावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर, 'अशी' दिली प्रतिक्रिया
राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यावर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनीधींनी श्रीनिवासशी संवाध साधला. यावेळी श्रीनिवासने आपला आनंद व्यक्त केला. आपल्यासोबतच आपल्या आईवडिलांनाही खूप आनंद झाल्याचे यावेळी श्रीनिवासने सांगितले.
श्रीनिवासचे वडील गणेश पोकळे यांनी या पुरस्काराचे खरे श्रेय 'नाळ'च्या संपूर्ण टीमला दिले आहे. तर, श्रीनिवासची आई अर्चना पोकळे यांनीही आपल्या बाळाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
Last Updated : Aug 10, 2019, 9:20 PM IST