मुंबई- देश-विदेशातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास म्हणते, की तिचे पालन-पोषण तिच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. प्रियंका म्हणाली, "मी पारंपरिक भारत आणि त्यातील पुरातन प्राचीन शहाणपणा आणि आधुनिक भारताची शहरी धावपळ यांच्या मिश्रणातून बनले आहे. माझे पालनपोषण पूर्व आणि पश्चिम अशा दोन भारतीयांचा मेळ आहे."
हेही वाचा -'आश्रम' वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनची बॉबी देओलला प्रतीक्षा
अभिनयाबद्दल बोलताना प्रियंकाने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या तिच्या आगामी 'द व्हाइट टायगर' चित्रपटामध्ये व्यग्र असल्याचे सांगितले. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव याच्यासह प्रियांकासुद्धा आहे. याशिवाय प्रियंका रॉबर्ट रॉड्रिग्जच्या पुढच्या सुपरहीरो फिल्म 'वी कॅन बी हिरोज्स' मध्येही ती दिसणार आहे.
हेही वाचा -शाकाहारी भोजनामुळे फिट आणि निरोगी - मानुषी छिल्लर
दरम्यान, प्रियंकाचे 'अनफिनिश्ड : ए मेमॉयर' हे पुस्तक तयार झाले आहे. पुढील वर्षी जानेवारी ते सर्वांसाठी प्रकाशित होणार आहे.