महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 22, 2022, 3:56 PM IST

ETV Bharat / sitara

जे प्रेमात आहेत आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे त्यांच्यासाठी नवीन मालिका ‘मुरांबा’!

स्टार प्रवाह आता दुपारच्या वेळेतही प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. प्रवाह दुपार या नव्या स्लॉट अंतर्गत लग्नाची बेडी आणि मुरांबा या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Muramba
Muramba

मुंबई - स्टार प्रवाह आता दुपारच्या वेळेतही प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. प्रवाह दुपार या नव्या स्लॉट अंतर्गत लग्नाची बेडी आणि मुरांबा या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह प्रेक्षकांची अभिरुची जपत मनोरंजन विश्वात नवनवे प्रयोग करत असते. दर्जेदार मालिका, उत्तम लिखाण, आपलीशी वाटणारी पात्र आणि जोडीला कसदार दिग्दर्शन यामुळेच आज स्टार प्रवाह वाहिनीने घराघरातच नाही तर प्रेक्षकांच्या मनात स्थान पटकावलं आहे.

लग्नाची बेडी ३१ जानेवारीपासून तर मुरांबा १४ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रेमाचा हा आंबट गोड मुरांबा कसा मुरणार याची गोष्ट ‘मुरांबा’मधून उलगडेल. सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय मुकादम असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. त्याच्या फॅन्ससाठी शशांक घेऊन आलाय अनोख्या लव्हस्टोरीची खास भेट. ‘मुरांबा’ मध्ये शशांक केतकर पुन्हा एकदा रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे.

शशांक केतकर नवीन भूमिकेत
या भूमिकेविषयी सांगताना शशांक केतकर म्हणाला, ‘जवळपास दीड वर्षांनंतर लव्हस्टोरी घेऊन भेटीला येतोय. मुरांबा या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कौटुंबिक गोष्ट आहे. नात्यांमधले ऋणानुंबध त्यातला गुंता यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार. त्यांनी प्रवाह दुपारच्या माध्यमातून आता दुपारीही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा प्रवाह सुरु केला आहे. त्यामुळे जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे त्यांच्यासाठी मुरांबा ही मालिका छान गिफ्ट असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details