महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मुंबई मॅरेथॉन : टायगर श्रॉफ, राहुल बोस यांनी दिला फिटनेस मंत्र - टायगर श्रॉफ, राहुल बोस यांनी दिले फिटनेस मंत्र

टायगर श्रॉफने आणि राहुल बोस यांनी आपले काही अनुभवही यावेळी शेअर केले.

Mumbai Marathon: Tiger Shroff and Rahul Bose share their experience
टायगर श्रॉफ, राहुल बोस यांनी दिले फिटनेस मंत्र

By

Published : Jan 19, 2020, 12:35 PM IST

मुंबई - शहरात आज पहाटे टाटा मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अभिनेता टायगर श्रॉफ आणि राहुल बोस यांनीही हजेरी लावली होती. दरम्यान त्यांनी प्रेक्षकांना फिटनेसबद्दल जागरुक राहण्याचं आवाहन केले आहे.

टायगर श्रॉफने आपले काही अनुभवही यावेळी शेअर केले. टायगर १४ वर्षांचा असताना त्याने मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.
पर्यावरण संरक्षणाबाबतही त्याने यावेळी संदेश दिला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडं लावण्याची गरज आहे, असे तो म्हणाला.

फिटनेसबाबत बोलताना तो म्हणाला, की 'मोबाईलमध्ये फार वेळ घालवण्यापेक्षा घराबाहेर पडून हालचाल करत राहावी. त्यामुळे व्यायामही होईल आणि निरोगी राहता येईल.

मुंबई मॅरेथॉन : टायगर श्रॉफ, राहुल बोस यांनी दिले फिटनेस मंत्र

हेही वाचा -पूजा बेदीच्या मुलीने बदललं नाव, आलियाची झाली अलाया

अभिनेता राहुल बोसनेही आपले अनुभव शेअर केले. २००३ सालापासून तो मॅरेथॉनमध्ये धावत आहे. २००७ साली तो या इव्हेंटचा ब्रँड अॅम्बॅसडरही होता. मागच्या काही वर्षापासून तो हाफ मॅरेथॉन धावत आहे. त्याच्या एनजीओमार्फत फंड रेसमध्ये धावण्यासाठी तो यावेळी सहभागी झाला होता. हा अनुभव खूप चांगला होता, असेही तो म्हणाला.

या मॅरेथॉनची पहिली अमॅच्युर धाव पहाटे ५.१५ मिनिटांनी सुरू झाली. या स्पर्धेत वेगवेगळ्या देशातून आणि राज्यातून स्पर्धक सहभागी झाले आहेत. आंतराष्ट्रीय स्पर्धकांसह या स्पर्धेमध्ये एकूण ५५ हजार ३२२ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

मुंबई मॅरेथॉनमधील एकूण स्पर्धकांपैकी ९ हजार ६६० स्पर्धक फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी आहेत. १५ हजार २६० स्पर्धक हाफ मॅरेथॉन, ८ हजार ०३२ स्पर्धक १० किलोमीटर , १९ हजार ७०७ स्पर्धक ड्रीम रन , १ हजार ०२२ स्पर्धक सिनियर सिटीजन, १ हजार ५९६ स्पर्धक दिव्यांग तर ४५ टिम पोलीस स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

हेही वाचा -सारा - कार्तिकच्या 'लव्ह आज कल'च्या ट्रेलरबाबत सैफ म्हणतो....

ABOUT THE AUTHOR

...view details