महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

डोंगरी दुर्घटनेवर बॉलिवूड कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया - wall collapsed

अभिनेता आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, परिणिती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत डोंगरी दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

डोंगरी दुर्घटनेवर बॉलिवूड कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

By

Published : Jul 16, 2019, 10:10 PM IST

मुंबई -शहरातील डोंगरी परिसरातील केसरबाई ही १०० वर्षे जुनी इमारत सकाळी कोसळली. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री विखे पाटील यांनी दिली आहे.

या दुर्घटनेत १० जणांचे मृतदहे सापडली आहेत. तसेच या घटनेत ९ जण जखमी असल्याची अधिकृत माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेबाबत बॉलिवूड कलाकारांनीही दु:ख व्यक्त केले आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहनही कलाकारांनी केले आहे.

अभिनेता आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, परिनीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत डोंगरी दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details